मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली प्रभाग 18 मध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

मुख्य संपादक महेश पवार 9579951540
मा.रोहित विजय जगदाळे यांनी आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने सांगली प्रभाग १८ मधे सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.सलग ४ वर्ष हा उपक्रम ते या भागात राबवत आहेत.सुधीरदादा गाडगीळ यांचा हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरास प्रभाग 18 शामराव नगर भागांमधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये 70 ते 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबिरास भारतीय जनतापार्टी प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार साहेब,मा.पृथ्वीराज बाबा पाटील,जिल्हा अध्यक्ष प्रकाशमामा ढंग,नितीनराजे शिंदे,मंडल अध्यक्ष राहुल नवलाई,तसेच सर्व पदाधिकारी शरद नलवडे,अजीजभाई शेख,सूरजमामा पवार,रोहित बाबर,सुमित शिंदे,ओंकार जाधव,नितीश पाटील,उमेश नरगुंदे,निलेश जगदाळे,अमर पडळकर,शहाजी भोसले,सुहास (त्तामा) आवळे, विजय नरूटे,चंदन सनदी,अजय मोर्चे,अमर सम्राट,संतोष लवाटे,प्रशांत शिकलगार,नबी मुजावर,अत्तार बानदार,हर्षद ताटे,सुभाष खांडेकर,लियाकत शेख,नागरिक तसेच महिला देखील उपस्थित होते.