सांगलीत डबल मर्डर: दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाच्या दिवशीच खून

मुख्य संपादक: महेश पवार 9579951540
सांगली शहरातील दलि महासंघ या संघटनेचा राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते (वय 41 राहणार गारपीर चौक सांगली) याचा धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी उत्तम मोहिते याचा वाढदिवस होता तो साजरा करत असताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान उत्तम मोहिते याच्यावर हल्ला करणाऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान गारपीर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शाहरुख उर्फ शेऱ्या शेख (वय 30 राहणार इंदिरानगर सांगली) असे संशयीताचे नाव आहे. उत्तम मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता रात्री मोहिते याच्या गारपीर चौक येथील घराजवळ त्याचे मित्र तसेच समर्थक वाढदिवस साजरा करत होते त्यावेळी संशयित शेख तेथे गेला होता त्यावेळी मोहिते व त्याच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला त्यानंतर शाहरुख ने गुप्ति सारख्या धारदार शस्त्राने मोहिते याच्यावर सपासप वार केले. मोहिते याने डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या पोटावर आणि छातीवर वर्मी घाव बसला वार एवढे जोरदार होते की त्यामध्ये त्याची आतडी बाहेर आली होती. तर डावा हात कोपरातून तुटला होता. हल्ला झाल्यावर उत्तम मोहिते जागेवरच कोसळला ते पाहून त्याच्या वाढदिवसासाठी जमलेल्यांनी शेखला पकडून बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र उशिरापर्यंत पोलिसांनी शेख याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. उत्तम मोहिते याचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे. एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, यांनी पथकासह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.





