अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या पाच जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुख्य संपादक महेश पवार 9579951540
मिरज तालुक्यातील एका गावात एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार गायकवाड यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची किरण नायकू नलवडे (वय २९), वैशाली अशोक चौगुले, अशोक बाबू चौगुले, नायकू पांडुरंग नलवडे आणि सविता नायकू नलवडे अशी नावे आहेत. दि. २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास १६ वर्षीय तरुणीचे लग्न करण्याचा वरील संशयितांनी प्रयत्न केला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर संजयकुमार गायकवाड यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तरुणीचे वय १६ वर्षे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार दि. ६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.





