दिराला मुलगी पाहायला निघालेल्या महिलेचा मिरजेत डंपर खाली चिरडून मृत्यू

मुख्य संपादक महेश पवार 9579951540
मिरज–पंढरपूर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटलसमोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.
अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव नंदनी मच्छिंद्र दोलतडे (वय 32) असे असून जखमी पतीचे नाव मनोज कृष्णदेव दोलतडे (वय 32) असे आहे. दोघेही मोटारसायकलवरून मिरजकडून सोलापूरच्या दिशेने दिराला मुलगी पाहण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहिती नुसार, नंदनी दोलतडे या मोटारसायकलवर पाठीमागे बसल्या होत्या. सिव्हिल हॉस्पिटलसमोर येताच मागून येणाऱ्या भरधाव MH-10-7326 या डंपरने त्यांनी पाठलाग करून जोरदार धडक दिली. धडकेनंतर नंदनी दोलतडे या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पती मनोज दोलतडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर डंपर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





