गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना:शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार
व्हिडीओ काढून ब्लेकमेल करण्याचा आरोप

मुख्य संपादक महेश पवार 9579951540
गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संताप जनक घटना बुलढाणा मधून समोर आली आहे. प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देतो असे सांगत, विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातही विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत असून नराधम शिक्षकाला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी मुकेश परमसिंग रबडे वय 40 वर्ष, राहणार तरोडा, तालुका मोताळा, या शिक्षकाची व विद्यार्थिनीची ओळख होती. शिक्षकाने तरुणीला मोबाईलवर कॉल करून तुझे प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देण्यास सांगतो असे सांगून मलकापूर येथील तहसील चौक येथे बोलावले, त्यानंतर गाडीवर बसवून बुलढाणा रोडवरील पंचमुखी जवळील एका खोलीत नेले, त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केले. तसेच त्याचे रेकॉर्डिंग ही केले. वारंवार त्रास व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी शिक्षक मुकेश रबडे याने विद्यार्थी तरुणीला देऊन मारहाण करून जबरदस्तीने वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले. त्याचे अशिल व्हिडिओ ही काढले. व तिला तहसील चौकात आणून सोडून दिले. याबाबत कोठे वाच्यता केली तर व्हिडिओ, स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल करू अशी धमकीही दिली. यानंतर आरोपी रबडे याने अनेक वेळा त्या तरुणीला फोन केले, मात्र पीडित तरुणीने फोन न उचलल्यामुळे तो धमकी देऊ लागला. या त्रासाला कंटाळून तरुणीने तिचे वडील, भाऊ यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तक्रारीवरून शिक्षकासह दोन आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीस अटक केली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.





