इचलकरंजीच्या तिघांना कोयता व चाकूसह मिरज पोलिसांनी केली अटक

मुख्य संपादक महेश पवार 9579951540
मिरज शहर पोलिसांकडून इचलकरंजी मधून आलेल्या संशयित तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन कोयते एक सुरा आणि दोन चाकू पोलिसांनी जप्त केले आहे याबाबत कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे वय 20 राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय 19 राहणार इचलकरंजी अभिषेक अमर कांबळे वय 20 राहणार इचलकरंजी अशी तिघांना अटक केलेल्यांची नावे आहेत

पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कविता बारवकर यांनी मिरज शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याबाबत कारवाईचे आदेश मिरज शहर पोलिसांना देण्यात आले होते त्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण चौगले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक नेहमीप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त घालत असताना मिरजेतील शास्त्री चौक परिसरात तिघेजण मोपेड दुचाकी सह संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या अंग झडतीत धारदार दोन कोयते एक सुरा आणि दोन चाकू पोलिसांना मिळून आले पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम, धुमाळ, झाकीर हुसेन काझी, शक्ती पोकळेकर ,गजानन बिरादार, सचिन सनदी, नितीन मोरे, तेजस लोंढे, राजेश गवळी, सचिन ऐवळे, स्वप्निल नायकोडे यांनी केली आहे





