*मिरजेत मामा भाच्यावर चाकू व कोयत्याने हल्ला!!सात आरोपींवर गुन्हा दाखल

मुख्य संपादक महेश पवार 9579951540
मिरजेत मामा-भाच्यावर चाकू व कोयत्याने हल्ला करत चाकूने भोकसून व कोयत्याने वार करून दोघांना जखमी करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री कमानवेस येथे ही घटना घडली असून पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
परसराम बसाप्पा सत्यनावर (वय ५५, रा. कमान वेस, मिरज) यांनी पोलिसात फिर्याद दिली असून ते व त्यांचा भाचा संतोष सदाशिव सनदे हे दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पृथ्वीराज उर्फ पिट्या राहुल भोरे, रुद्र शक्ती भोरे, ऋषभ भोरे, रुद्र भोरे, शक्ती राजू भोरे, प्रेम उदय लोंढे, अक्षरा शक्ती भोरे (सर्व राहणार कमान वेस मिरज) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिठ्या भोरे याने सत्यनावर यांचा भाचा संतोष यास घरासमोर अडवले. गाडी हळू चालव असे म्हणून अर्वाच्या शिवीगाळ केली. संतोष याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. दुचाकीची चावी परत मागत असताना पिट्या भोरे हा हातात कोयता घेऊन आला. तुम्हाला मस्ती आली आहे असे म्हणून शिवीगाळ करू लागला. सत्यनावर हे त्यास समजून सांगत असताना त्याने त्यांच्या पाठीत कोयत्याने वार केला. यावेळी संबंधित सर्वांनी संतोष यास खाली पाडून मारहाण केली. यापैकी रुद्र शक्ती भोरे याने हातातील चाकूने संतोष याच्या डाव्या पायाच्या मांडीत व खुब्यात भोकसुन जखमी केले. तसेच फिर्यादी सत्यनावर यांच्या पत्नी, बहीण व मुलगी यांना अक्षरा शक्ती भोरे हिने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसात देण्यात आलेल्या या फिर्यादीनुसार मिरज शहर पोलिसांनी सात जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यापैकी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मिरज शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.





