ताज्या घडामोडी
15 ऑगस्ट 79 वा स्वातंत्र्यदिन ओम उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था अभयनगर यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*

सांगली प्रतिनिधी राजू कलाल 9370705100
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑगस्ट 79 वा स्वातंत्र्य दिन ओम उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था अभयनगर सांगली यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक राजू पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नारायण हांडे, राजू कलाल, काशिनाथ वांडरे, अरुण बनणे, गणपत पवार, गणेश कांबळे, विशाल कदम, संभाजी जाधव, तुपे, कांबळे सर, तर महिलांमध्ये माधुरी पाटील, राजश्री कलाल, शोभा जाधव, निर्मला कदम, सुरेखा कदम, कविता सर्वदे, दिव्या हजारे, वारे मॅडम, पवार मॅडम, कांबळे मॅडम, तसेच परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात ध्वजारोहण करण्यासाठी हजर होते.





